…अन्यथा भाजपवर बहिष्कार टाकू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- मराठा समाजाच्या पहिल्या टप्प्यातील मागण्या मान्य करा अन्यथा भाजपवर बहिष्कार टाकू, असे पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लिहण्यात आले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी विरोधात मराठा क्रांती मोर्चा आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरू भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यानंतर सरकारसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात आम्हाला रस नाही मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही प्रतिनिधी सरकार सोबत यापुढे चर्चा करणार नाही अशी या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रात मांडण्यात आलेले विषय –

मागण्या मान्य न करून मराठा समाजाची फसवणूक-
कोपर्डी खटल्यातील आरोपींना तत्काळ फाशी, आरक्षण, ॲट्रोसीटी-अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, शिवस्मारक अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. महाराष्ट्र तसेच इतर ठिकाणचे मिळून एकूण ५८ हून अधिक मोर्चे निघाले या मोर्चांनी देशाला एक नवा आदर्श घालून दिला. तरीही यांनतर मागण्या मान्य होत नाहीत म्हणून अनेक आंदोलन, उपोषण झाली या आंदोलनादरम्यान अनेक युवकांनवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल झाले तसेच या लढ्यात काही बांधवांनी आत्मबलिदान दिले लोकशाहीच्या मार्गाने मराठा समाजाने आपल्या मागण्या सरकार समोर मांडल्या होत्या तरी आजवर सरकारने कुठलीही मागणी मान्य न करून मराठा समाजाची फसवणूकच केली आहे.

मग आम्हाला न्याय कोण देणार-
आर्थिक नुकसान झाल, सामाजिक नुकसान झाल मराठा विरुध्द दलित, मराठा विरुध्द ब्राम्हण अस एक मेकांसमोर उभे टाकले गेले दोन समाजामध्ये दरी निर्माण झाली जी कधीही न भरून निघणारी आहे. काँग्रेस सरकारने मराठा समाजावर मागील ४० वर्ष अन्याय केला आणि त्यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला म्हणून तर जनतेने परिवर्तन करत भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून दिल का तर हे प्रत्येक घटकाला न्याय देतील पण मराठा समाजाला आपल्या सरकारने काय न्याय नाही उलट समाजाची फसवणूकच केली. भाजपच नाही तर सगळेच पक्ष मराठा समाजाला न्याय देण्यात अपयशी ठरले आहेत. सरकारने मराठा समाजाला फसवल, विरोधकांनी मराठा समाजाला फसवलं मग आम्हला न्याय देणार कोण ?

फसवे आरक्षण –
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जाता जाता आरक्षण दिलं ते ही कोर्टात टिकल नाही. खर तर मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा हकदार आहे पण मागची ४० वर्ष ज्या काँग्रेस सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली तेच लपवण्यासाठी मराठा समाजाला SEBC अंतर्गत जाणार्या फसव्या आरक्षणामध्ये सरकारची साथ दिली.

तर लोकसभा निवडणुकीत भाजपवर बहिष्कार –
सरकारच्या नाकार्तेपणामुळे त्या मागण्यांचा लाभ मराठा समाजाला मिळत नाही आरक्षण जाहीर केलं तेही कोर्टात अडकल याच्या निषेधार्त १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पंढरपूर या ठिकाणी झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजप सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीत भाजपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.