मराठा मोर्चाः राजीनामाच काय प्राणही देऊ – अामदार आहेर 

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा पदाधिकाऱ्यांकडे सोपवू. एवढेच नाही तर प्रसंगी प्राणाची आहुती द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार डाॅ.राहुल दाैलतराव आहेर यांनी दिला.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6c20ff9-90b8-11e8-bb51-a3ade71a7b11′]

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंद आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि.26) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने समाजाच्या लोकप्रतिनिधींनी पाठींबा द्यावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार आमदार आहेर यांनी जिल्हाधिकारी आवारात समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेत आंदोलनास पाठींबा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी पदाधिकार्‍यांनी राजीनामा मागितल्यास तत्काळ देऊ आणि प्रसंगी आरक्षणासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी तो देऊ, असे सांगत कार्यकर्त्यांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान आमदार आहेर यांचा हा इशारा पक्षालाच आव्हान देणारा आहे.