नवी मुंबई मराठा समाज ९ तारखेच्या आंदोलनात नाही

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ तारखेला होणाऱ्या आंदोलनात नवी मुंबई मराठा सकल समाज सहभागी होणार नाही अशी माहिती माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37729c06-9a27-11e8-9e61-1de677456ebc’]

आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाकडून ३ ऑगस्टला एक पानी स्टेटस रिपोर्ट राज्य सरकारला सादर करण्यात आला हाेता. या रिपोर्टमध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. आज  मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सादर केले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाकरिता आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान मराठा आंदाेलकांनी 9 आॅगस्ट राेजी भव्य माेर्चा काढण्याचा ईशारा दिला आहे. मात्र या माेर्चामध्ये नवी मुंबईतील सकल मराठा समाज सहभागी हाेणार नसल्याची माहीती पाटील यांनी दिली.

मराठा समाजाच्या आंदोलनातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी वाशी येथील माथाडी कामगार भवनात सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर पाटील यांनी ही घोषणा केली.

या निर्णयामुळे नवी मुंबईतील बाजारपेठा, बाजार समित्या, औद्योगिक क्षेत्र चालू रहातील.