मराठा आंदोलन : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

आज मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले आहे. याचे पडसाद सर्वत्र उमटताना पाहायला मिळाले आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलक अधिकच आक्रमक झाले. दरम्यान त्यांनी थेट गेट वर चढून आत प्रवेश केला आणि कार्यालयाच्या काचा व  दिवे यांची तोफफोड केली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19f5410d-9bb1-11e8-9380-f51dd5e40397′]

खुद्द जिल्हाधिकारी देखील त्यांच्या केबिन मधून बाहेर गेटवर आले आहेत. पोलीसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर चप्पल फेकण्याचा प्रकार केल्याचे समजते आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे यथे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहे.

पुण्यामध्ये आंदोलन कर्त्यांनी मोर्चा कढून आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. मात्र, जिल्हाधिकारी यांनी खाली येऊन आंदोलन स्विकारावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी खाली येऊन निवेदन स्विकारण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या अंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली.

जिल्हाधिकारी कार्य़ालय बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून संतप्त अंदोलक आजूनही याठिकाणी ठिय्या मारुन बसले आहे. बंडगार्डन पोलीसांचा ताफा जिल्हाधिकारी कार्य़ालयाबाहेर तैनात करण्यात आला असून पोलिसांना आंदोलनकांवर नियंत्रण मिळवता आले नाही. पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
दरम्यान, या अंदोलनाचे चित्रीकरण करण्यासाठी आणि वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या १५ पत्रकारांना अंदोलकांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

काय म्हणाले जिल्हाधिकारी  नवलकिशोर राम
२ दिवसांपासून  सतत मराठा समाजाच्या समन्वयकांच्या सोबत आम्ही संपर्कांत आहोत . सकाळी ११ ते १ या वेळात हे आंदोलन करण्यात येणार होते . त्यानुसार सांगेल शांततेत चालू होते. त्यानुसार सकाळी मला मराठा समाजाच्या समन्वयकानी निवेदन दिले . त्यांच्यासोबत काही महिला देखील होत्या . तसेच काही पत्रकार देखील उपस्थित होते. मी त्यांचे निवेदन स्वीकारले . पण समन्वयक निवेदन देऊन बाहेर गेल्यानंतर काही तरुण आंदोलकांनी हे तोडफोडीचे प्रकार केले ” असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आम्ही आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करतो आहे असे जिल्हाअधिकाऱ्यानी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले .