मराठा मोर्च्यात पोलिसांवर दगडफेक, डीवायएसपीसह अधिकारी, कर्मचारी जखमी

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा मोर्च्यात पोलिसांवर दगडफेक, डीवायएसपीसह अधिकारी, कर्मचारी जखमीयांमध्ये देहूरोड डीवायएसपी, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी मागवलेल्या वाहनांची तोडफोड केली. सध्या चाकणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तणाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर नळकांड्याचा वापर करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणास आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी आणि काकासाहेब शिंदे या तरुणाला न्याय मिळण्यासाठी आज सकल मराठा मोर्च्याच्या चाकण पदाधिकाऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज सकाळ पासून चाकण परिसरातील बाजारपेठा बंद आहेत. तर कार्यकर्त्यांनी महामार्गावर रस्ता रोको केला. दुपार प्रयत्न आंदोलन शांततेत सुरू होते.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31b6028e-93dc-11e8-9446-37a078aed9b9′]

दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव फाटा येथे अचानक जमाव संतप्त झाला. रस्त्यावरील वाहनांची तोडफोड सुरू केली. यावेळी पोलीस गेले असता त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. डीवायएसपी जी.एस. माडगूळकर यांच्या पायाला लागले आहे. तर उपनिरीक्षक अर्जुन पवार यांना पाठीत लागले आहे. यामुळे चाकण परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.डीवायएसपी पठारे यांच्या गाडीला आग लावण्यात आली आहे.

– चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन

– चाकणमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, 100 ते 150 गाड्या फोडल्या

– चाकणमध्ये मध्ये मराठा आंदोलन चिघळले, एसटी बस पेटवली

– चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. यात एक एसटी बस जाळण्याचा प्रयत्न झाला परंतु पोलिसांनी ती लगेच विझवली.

[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e16634d2-93dc-11e8-9838-bf28aa8e4020′]