Maratha Protesters In Solapur |संतप्त मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला गावातून परत पाठवले

सोलापूर : Maratha Protesters In Solapur | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar NCP) गटाचे सोलापुरातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (MLA Babanrao Shinde) यांचे पुत्र तसेच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी गावातून परत पाठवले. शिंदे हे ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावात हा प्रकार घडला.

ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी रणजितसिंह शिंदे हे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासोबत आले होते. शिंदे हे गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर गावातील मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना अडविले. संतप्त तरूणांनी त्यांना, राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी असताना तुम्ही का आले, असा प्रश्न केला.

तुमचे वडील तीस वर्षे आमदार असून त्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांसाठी कुणबी प्रमाणपत्र मिळविले. सकल मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी काय केले? उलट अन्य समाजाला सवलती द्याव्यात म्हणून शासनाला पत्र कसे दिले? असे प्रश्न मराठा आंदोलकांनी केली.

तसेच, आमदार बबनराव शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी पन्नास हजारांची मदत दिल्याची जाहीर वाच्यता केली होती, तेव्हा मराठा आरक्षण आंदोलकांनी लोकवर्गणी गोळा करून आमदार शिंदे यांना मदतीची रक्कम परत केली होती, याची आठवण रणजितसिंह शिंदे यांना यावेळी मराठा आंदोलकांनी करून दिली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या संदर्भात रणजितसिंह शिंदे यांची एक
वादग्रस्त चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. यावरून सुद्धा मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला शिंदे
यांना तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे यांनी माफी मागितली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे

Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप