धक्कादायक ! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मराठा आरक्षणा (maratha reservation) बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. मराठा आरक्षणा(maratha reservation)साठी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. केतूरा गावात ही घटना घडली असून विवेक राहाडे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

विवेकने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाली. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. मराठा आरक्षण असते तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अशाच नैराश्येतून लातूरमध्ये गेल्या आठवड्यात एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून विविध आंदोलने करण्यात येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like