मराठा आरक्षण : मराठा समाजाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आमच्यासाठी भयावह क्षण’

औरंगाबादः पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे राज्य घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला देता येणार नाही. 50 टक्के आरक्षण देणे हे उल्लंघन असल्याचे मत न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अखेर निराशा आली आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केलेले याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आमच्यासाठी हा भयानक असा क्षण आहे. या निकालाचा परिणाम राज्यातील मराठा समाजातील तरुणावर होणार आहे. तसेच राज्य सरकारने कोणतीही युक्ती आखली नाही. त्यांना आरक्षण द्यायचा इरादा नाही, असेही मी म्हणत नाही. स्थगिती न देता अंतिम निर्णय घेऊ असे कोर्टाने म्हटले होते. पण, राज्य सरकार कुठे तरी कमी पडल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.

विनोद पाटील म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. इंदरा साहनी प्रकरणाचा फेरविचार करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात स्थगित असलेले आरक्षण थांबले पाहिजे. महाराष्ट्र आरक्षणाचा रिपोर्ट सुद्धा कोर्टाने थांबवला आहे. न्यायमूर्तींनी वेगवेगळी मत दिली आहेत. कोर्टाच्या विरोधात आम्हाला बोलायचे नाही. पण सविस्तर निकाल हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे ते पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या समोर सुरू होते. ते तर आता स्थगिती केले आहे, उच्च खंडपीठाकडे जाण्यासाठी आमच्याकडे पर्याय आहे. ज्येष्ठ वकिलांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे पाटील म्हणाले.