अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमध्ये (kolhapur) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची (Chhatrapati Shahu Maharaj) यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी बैठकीदरम्यान मराठा संघटनेचे नेते, संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे उपस्थितीत होते.

अजित पवार (Ajit pawar) आणि छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्यात तासभर बैठक सुरु होती. बैठक संपल्यानंतर ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सकारात्मक असल्याचं छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी सवांद साधला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

यावेळी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) म्हणाले, चर्चेमध्ये मराठा आरक्षण मुद्यासह इतर गोष्टीमध्ये चर्चा झाल्या. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सरकार निश्चित सकारात्मक आहे. तसेच मराठा समाजासाठी जे शक्य आहे ते करणार असल्याचे अजित पवार (Ajit pawar) यांनी चर्चेत म्हटलं असल्याचं छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी सांगितले.

तर अजित पवार (Ajit pawar) याबाबत सविस्तर सांगतील असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जो निकाल दिला आहे त्यावर सर्वानी अभ्यास करणं आवश्यक आहे.
तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे, असं मराठा आरक्षणावर बोलले आहेत.
तसेच, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) अन्य मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे.
आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी असं सांगितलं आहे की, मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे,
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे गरजेचा आहे.
त्याचं मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसेच न्यायालयाचा अवमान होता कामा नये, असे ते म्हणाले.
या दरम्यान, मराठा आरक्षणसाठी (Maratha reservation) ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
तसेच, केंद्राने जर येथे लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे अगोदर सांगायला हवे.
कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,
असं देखील यावेळी ते म्हणाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : maratha reservation after meeting with ajit pawar chhatrapati shahu maharaj big statement on maratha reservation in kolhapur

 

हे देखील वाचा

Milkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोविडमुळे निधन

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष सोडणार? केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस