Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका

जालना : Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथील बैठकीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले, यानंतर ते मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले होते. यामुळे एकुणच स्थिती बिघडत चालली होती. त्यातच काही ठिकाणी रास्तारोकोमध्ये अनुचित प्रकार घडल्याने, सरकारने खबरदारी म्हणून छत्रपती संभाजी नगर, बीड आणि जालन्या या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काल बंद केली होती. मात्र, याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसल्याने तब्बल १०० कोटींचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड आणि जालन्या या तीन जिल्ह्यांत ५ तास इंटरनेट सेवा बंद केली होती. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. बँका, कंपन्या, व्यापारी आणि ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली. इंटरनेट सेवा पुन्हा पूर्वपदावर आल्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले होते. सर्वच ऑनलाईन प्रक्रिया संपूर्णपणे बंद पडल्या होत्या.

कुठलाही चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये आणि अफवा पसरू नये, यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले होते.
परंतु त्याचा मोठा फटका उद्योजक, व्यापारी, शासकीय आणि खासगी कार्यालयांना बसला.
खबरदारी म्हणून पोलीस आणि प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना