Maratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) कायदा (Law) रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरुन राजकारण (Politics) तापले आहे. या पर्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे (BJP MP Sambhajiraje) यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मूक आंदोलन (Silent movement) केले. यानंतर आज (गुरुवार) खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची घेतली. यानंतर मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणामध्ये राज्य सरकार (State Government) आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (Review Petition) दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Congress leader Ashok Chavan) यांनी दिली. तसेच खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या सर्व मागण्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे, असे म्हणत संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं स्पष्ट केलं.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण (Maratha reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan), सदस्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil), अनिल परब (Anil Parab), खासदार संभाजीराजे तसेच सकल मराठा समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

खा. संभाजीराजे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या
1.
ओबीसीच्या (OBC) धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा

2. मराठा आरक्षणामुळे (Maratha reservation) 2014 ते 5 मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.

3. आण्णासाहेब पाटील महामंडळाला (Annasaheb Patil Mahamandal) 2 हजार कोटींचा निधी द्यावा.
लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची 10 लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रुपये करावी.

4. सारथी (Sarathi) संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सरु करावीत.
त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरु करुन त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत.
संस्थेला 1 हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तात्काळ सुरु करावा. संस्थेला स्वायत्तता पुन्हा बहाल करावी.

5. शासनाकडून पंजाबराव देशमुख वसितगृह निर्वाह भत्ता (Punjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance) दिला जातो.
मुंबई, नागपूर, पुणे (Mumbai, Nagpur, Pune) अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 हजार रुपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 हजार प्रति महिना दिले जातात.
ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतीगृहांची उभारणी करावी.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.

Wab Title : maratha reservation ashok chavan press conference after meeting with sambhaji raje chhatrapati

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा गंभीर आजार Myopia चा धोका, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

pune municipal corporation | ‘कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे 20 टक्केच काम; कामाची मुदत 6 महिन्यांत संपतेय, भूसंपादनाशिवाय दिलेली ‘वर्क ऑर्डर’ सत्ताधार्‍यांच्या अंगलट