Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) कायदा (Law) रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरुन राजकारण (Politics) तापले आहे. या पर्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे (BJP MP Sambhajiraje) यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मूक आंदोलन (Silent movement) केले. यानंतर आज (गुरुवार) खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची घेतली. यानंतर मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणामध्ये राज्य सरकार (State Government) आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (Review Petition) दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Congress leader Ashok Chavan) यांनी दिली. Maratha Reservation | ashok chavan says state govt will file reconsideration petition supreme court over maratha

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan), सदस्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil), अनिल परब (Anil Parab), खासदार संभाजीराजे तसेच सकल मराठा समाजाचे प्रमुख नते उपस्थित होते.

अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– राज्य सरकार रिव्ह्यू पिटीशन (review petition) दाखल करणार, योग्य तयारी करुन कोर्टात भूमिका मांडू
– संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या केल्या
– संभाजीराजे यांच्या मागणीनुसार रविवारी सारथीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेतील.
– गुन्हे दाखल झालेले आहेत त्याबाबत एक केस वगळता इतर सर्व केसेसमधील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
– मराठा समजाच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावण्याच्या एमपीएससीला (MPSC) सूचना

Wab Title :- Maratha Reservation | ashok chavan says state govt will file reconsideration petition supreme court over maratha

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत