
Maratha Reservation | ‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’, भाजपचा हल्लाबोल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जालना येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार (Jalna Police Lathi Charge) करुन गोळीबार (Firing) केला. या घटनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर टीका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंवर आरोप केले आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांनी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. याला भाजप नेते (BJP Leader) आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. (Maratha Reservation)
ज्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार? असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. तसेच ‘त्यांचे आपले तेच सुरु आहे, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मै घर में बैठता हूं!’ असं म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लागवाला आहे. आशिष शेलार यांनी याबाबत आपल्याट्विटर अकांऊंटवरुन ट्विट केलं आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
उच्च न्यायालयात (High Court) टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या, पण पोलिसांच्या कारवाईसाठी
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवला. पण ज्यांनी मराठा आरक्षण घालविले,
ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार? आमची अपेक्षा होती की आज स्वतः ते राज्यपालांना
(Governor Ramesh Bais) भेटून माझ्या काळात मराठा आरक्षण गेले, मी राज्याच्या तमाम जनतेची माफी मागतो,
असे सांगतील. पण त्यांचे आपले तेच ते सुरू आहे, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मै घर में बैठता हूं! असं ट्विट
आशिष शेलार यांनी केलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात