Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सवाल, म्हणाले – ‘कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येईपर्यंत मराठा समाजानं थांबायचं का?’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणप्रश्नी Maratha Reservation खासदार संभाजीराजे भोसले यांनी घेतलेल्या आस्ते कदम भूमिकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणाचा कोरोनाशी काही संबध नाही. सगळ जनजीवन सुरळीत सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन्ही हातांनी खाण सुरू आहे. मग आरक्षणाच्या बाबतीत कसली अडचण आहे? कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येईपर्यंत मराठा समाजाने थांबायच का ? असा खडा सवाल पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील कोल्हापूरात प्रसारमाध्यंमाशी बोलत होते. खासदार संभाजीराजे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या आम्हाला मान्य आहेत. तात्काळ फेरविचार याचिका दाखल करा. 2 वर्षे कायदा अस्तित्वात असताना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या. त्या तरुण-तरुणींना नियुक्ती पत्रे द्या. आरक्षण मिळेपर्यंत सवलती द्या. मागास आयोग नेमा आदी संभाजीराजेंच्या मागण्या आहेत. या मागण्यांना आमचा आक्षेप नाही. मराठा आरक्षण Maratha Reservation तातडीने मिळण्यासाठी संघर्ष करण्याची आमची भूमिका आहे. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. पण संघर्ष करायचा नाही. कोविड संपल्यानंतर बघू ही त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही,असे पाटील यांनी म्हटले आहे. संभाजीराजेंची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल तर आम्हाला मान्य नाही. सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्ही खांद्याला खांदा भिडवून संघर्ष करू असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करण्याची 4 जून ही शेवटची तारीख आहे. पण ठाकरे सरकारकडून काही हालचाल होताना दिसत नाही. असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या