Maratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. बुधवारी कोल्हापूरात खासदार संभाजीराजेंच्या (MP Sambhaji Raje) मार्गदर्शनाखाली मूक आंदोलन (Silent movement) करण्यात आले. तर आता उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी थेट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीत गर्भित इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray,) यांना लिहिलेल्या पत्रात मराठा आरक्षणाबाबत सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा जाहीर इशारा दिला आहे. मराठा हा सर्व नेत्यांच्या मुखी आहे पण मराठ्यांच्या हाती खराटा आहे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. maratha reservation bjp mp chhatrapati udayanraje bhosale wright letter to cm uddhav thackeray , say

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

काय म्हंटले आहे या पत्रात

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न गंभीर होत चालला आहे.
मराठा हा सर्व नेत्यांच्या मुखी आहे पण मराठ्यांच्या हाती खराटा आहे.
हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे सरकारने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे नाहीत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
मराठा समाज (Maratha society) ४० वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहे.
त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत मराठा आता मागे हटणार नाही.
इतर समाजाला आरक्षण आहे तसेच आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे.
असे या पत्रात उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन (Special session) आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावावा.
त्यामुळे दूध का दूध पानी का पानी होईल.
परंतु हा निर्णय प्रत्यक्षात अमलात येईपर्यंत समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी.
जेणेकरून समाजाला तात्पुरता दिलासा मिळेल.
त्याकरिता खालील मागण्या आपणासमोर मांडत आहे.

सरकारची भूमिका ही मराठा समाज आश्वस्त होईल अशी असली पाहिजे. विशेषत: न्या. भोसले समितीने (Justice Bhosle Committee) ज्या काही बाबी सुचवल्या आहेत त्यानुसार तातडीने पुढची पावले उचलली गेली पाहिजेत.
तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न समजणारे तज्ज्ञ समाज सदस्यांचा राज्य मागासवर्ग आयोगात समावेश करून त्यांचे उपगट तयार करून न्या भोसले यांनी जे ‘टर्म्स अँड रेफरन्स’ (Terms and references) सांगितले आहे त्याप्रमाणे एम्पिरिकल डेटा तयार करावा.
या गोष्टी करत असताना मराठा समाजच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खालील मागण्या तातडीने मंजूर कराव्यात असेही या पत्रात म्हंटले आहे.

उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी पत्रातून मांडलेल्या सहा मागण्या

१) मराठा समाजातील विद्यार्थी बेरोजगार तरुण तरुणींना शैक्षणिक आणि व्यवसायाची दिशा देणारी सारथी संस्था ही संस्था आहे.
त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेऊन मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
त्यासाठी सारथी संस्थेची कार्यालय प्रत्येक महसूल विभागात सुरू करावी.
तसेच प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरू करून त्या ठिकाणी शिक्षण संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत.
याकरिता संस्थेला कमीत कमी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करून पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात.

२) मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या हाताला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम मिळावे.
तसेच स्वयम रोजगार निर्मिती करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उद्योग-व्यवसाय निर्मितीचा कार्यक्रम हाती घ्यावा.
त्याकरिता या महामंडळाला कमीत कमी २ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
लाभार्थी पात्रतेसाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करावी महामंडळामार्फत व्याज परताव्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रुपये करावी.
याची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात करावी.

३) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असताना राज्य शासनाने ९ सप्टेंबर २०२० रोजी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली.
त्यामुळे राज्यातील २१८५ उमेदवारांना शासनाने सेवेत सामावून घेतले गेले नाही.
या बाबतीत शासनाने सदर उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे ही बाब सरकारच्या अधिकारात असून सरकारने यात कसलाही हलगर्जीपणा न करता या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे.

४) गेल्या सरकारच्या काळात डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह भत्ता योजनेतून सुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुमारे १०० कोटींचे लाभ देण्यात आले होते.
तसेच लाभ आताही देण्यात यावे.
प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारणे ही बाब पूर्णता राज्यसरकारच्या अखत्यारीतील आहे.
त्यावर तातडीने कारवाई करावी.
जोवर वस्तीग्रह तयार होत नाही तोवर हा भत्ता देण्यात यावा.
मराठा विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज अशी वसतीगृहांची उभारणी करावी.
जेणेकरून मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शहरांमध्ये शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणी मुळे होणारी गैरसोय दूर होईल.
तसेच शासनाकडून दिला जाणारा वसतीगृह निर्वाह भत्ता अपुरा असून या रकमेत वाढ करावी.

५) आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये super numerary seats निर्माण करून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची तरतूद करावी.
अनेक शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हा निर्णय अत्यंत तातडीने घेणे आवश्यक आहे.
त्याबाबतची अधिसूचना तात्काळ काढावी जेणेकरून मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागेल.

६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Education Fee) प्रति पूर्ती योजनेचा लाभ ६०५ हून अधिक अभ्यासक्रमांना देण्याचा निर्णय हा गेल्या सरकारमध्ये झाला होता.
मेडिकल आणि इंजीनियरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क प्रतिपूर्ती करणारी ही अतिशय चांगली योजना आहे.
त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

वरील मांडलेल्या सर्व बाबी गंभीर असून उद्धवजी आपले सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊनही कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.
मराठा समाजाने आतापर्यंत खूप संयमाची भूमिका घेतली आहे.
पण आता सरकारने त्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नये, तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून मराठा समाजाला न्याय द्याल अशी मला आशा आहे,” असंही उदयनराजेंनी म्हंटले आहे.
त्याचबरोबर येत्या ५ जुलैपर्यंत सर्व मागण्या मंजूर केल्याची घोषणा कोणताही विलंब न करता सरकारने करावी अन्यथा मराठा समाजचा जो उद्रेक होईल त्याला त्याला सर्व लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी या पत्राच्या शेवटी दिला आहे.

 

Web Title : maratha reservation bjp mp chhatrapati udayanraje bhosale wright letter to cm uddhav thackeray , say

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Maratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य – ॲड. प्रकाश आंबेडकर