Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणा’संदर्भातील निर्णय सुप्रीम कोर्टानं आरक्षित ठेवला !

पोलिसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली आहे. सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय आरक्षित ठेवला आहे.

आज सुनावणी संपणार असल्यानं सर्वांनाच निर्णयाची प्रतिक्षा होती. परंतु सुप्रीम कोर्टानं याबाबत निर्णय दिलेला नसून तो आरक्षित ठेवला आहे. आता होळीनंतर निर्णय घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला नोकरी तसंच शिक्षणात दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. याबाबत आता सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला आहे.