मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही 27 जुलैपासून दररोज होणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक महिन्यांपासून कोर्टात रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या अंतिम निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत 3 ते 4 वेळा अंतरिम निर्णयावर दिलासा देण्यात आला आहे,, त्यात अजून किती बदल करायचा अशी विचारणा कोर्टाने केली आहे. सुप्रीम कोर्टात आज चौथी सुनावरणी पार पडली. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात न्यायमूर्ती एन. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांच्या खंडपीठात मागील काही दिवसांपासून सुनावणी होत आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरले.

आतापर्यंत मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय देत असताना पुढे ढकलण्यात आला होता. अशी कित्येक वेळा मुदत द्यायची आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात म्हणजेच 27 जुलै रोजी सुनावणी घेतली जाईल, पुढील सुनावणी ही 27 जुलैपासून दररोज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पुढील सुनावणीही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येईल असंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.

त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेश कायम राहतात का हे पाहणे महत्त्वाचे होते. त्याच संदर्भात आरक्षणासंदर्भात कोर्ट काय निर्णय देतं यावर आंदोलनाचं पुढचं पाऊल ठरणार आहे. या आरक्षणासाठी महाराष्ट्रात प्रचंड महामोर्चे निघाले होते. मराठा आरक्षण कायद्याची वैधता निश्चित करण्यासाठी तीन नाही तर पाच न्यामूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी, अशी एक मागणी होती. मात्र, सध्या पाच न्यायमूर्तींनी एकत्रित सुनावणी करणं शक्य होणार नाही, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एन.एन. राव यांनी 15 जुलै ही तारीख अंतरिम निर्णयसाठी निश्चित केली होती.