Maratha Reservation | चंद्रकांत पाटलांची सीबीआय चौकशी करा, मराठा आरक्षणासंबंधी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ, देवाण-घेवाणीचा उल्लेख

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) समन्वयकांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये देवाण-घेवाणीचा आणि काही नेत्यांचा उल्लेख असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर युवासेनेने, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. युवासेनेने म्हटले आहे की, सरकारला जर स्वच्छ मनाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) द्यायचे आहे तर समन्वयकांना पैशाचे आमिष दाखविण्याचे उद्योग चंद्रकांत पाटील का आणि कशासाठी करत आहेत? दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे (Youth Sena District President Ganesh Ingle) यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील आणि ज्यांची ज्यांची नावे यात आली आहेत, त्यांची सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करावी. मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी ज्या 42 बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याबद्दल चंद्रकांत पाटील आणि इतर दोषींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

समन्वयकांवर टीका करताना म्हटले आहे की, समाजाच्या नावाखाली दुकान चालवणार्‍या स्वयंघोषित नेत्यांनो… तुम्हाला पैशांची इतकीच गरज होती. तर प्रामाणिकपणे समाजाला तुमची अडचण सांगितली असती तर समाजाने देखील तुम्हाला कशाची ही कमी पडू दिली नसती. प्रत्येक मराठा बांधवानी 1 रुपया जरी जमा केला, तरी कोट्यवधी रुपये जमा होतील. काही पैशाच्या लालसे पोटी स्वतःच्या आणि समाजाच्या मुलांचे भविष्य विकू नका.

मराठा आरक्षणासंदर्भात व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) ही एक कॉल रेकॉर्डींग आहे.
यात मराठा आरक्षण आणि चंद्रकांत पाटील व मुंबईतील एका नेत्याचा उल्लेख आहे.
या ऑडिओ क्लिपवरून आता चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चात (Maratha Kranti Morcha) फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.

 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. फोडाफोडीचा प्रश्नच येत नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही लावून धरला होता. व्हायरल ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही,
असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विविध नावांचा उल्लेख झाला आहे.

 

Web Title :- Maratha Reservation | chandrakant patil reject allegations on maratha reservation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Almatti Dam | अलमट्टी धरणाची उंची वाढवून कोल्हापूर बुडवू पाहत आहेत, आमदार सतेज पाटील यांनी दिला इशारा

Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप

Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त