Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, चंद्रकांत पाटलांकडून विधानाची सारवासारव, म्हणाले… (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे आणखी एक नवा वाद उभा राहिला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलताना सावंत म्हणाले, आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असं वक्तव्य केलं आहे. मात्र, आता तानाजी सावंत यांच्या विधानाची सारवासारव भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी केली असून तानाजी सावंतांच्या बचावासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, तानाजी सावंत यांनी एखादं विधान केलं की त्याची तोडमोड करुन ते समोर आणलं जाते. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचा फरक समजून घेतला पाहिजे. आमच्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या बाबतीत नेहमी हेच होतं. पण ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की ते म्हणतात यात काय आहे तसं त्यांना म्हणायचं नव्हतं. तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचं होतं की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजींनी दिलं. म्हणजे भाजप सरकारने (BJP Government) दिलं ते हायकोर्टात (High Court) टिकवलं ते सुप्रीम कोर्टात (Supreme Court) एक वर्ष टिकवलं. मग अडीच वर्षात आंदोलन का केली नाही? असं सावंत यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. माझी हात जोडून विनंती आहे की उठ सूट गैरसमज करुन घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे की अडीच वर्ष का शांत बसला? त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की आता आपलं सरकार आलंय आपण करुयात असं म्हणत पाटील यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण केली.

 

 

 

काय म्हणाले तानाजी सावंत?

फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 2017-18 मध्ये मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं, टिकलं, दोन-तीन बॅचेस बाहेर आल्या, त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. मात्र 2019 साली लोकांचा विश्वासघात करुन तुम्ही सत्तेत आल्यानंतर सहाच महिन्यात आमचं आरक्षण गेलं, असे म्हणत सावंत यांनी राष्ट्रवादीवर (NCP) घणाघात केला. दोनवर्षे आरक्षण गेल्यापासून तुम्ही गप्प आणि सत्तांतर झाल्यानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हणत मराठा समाजाला उद्देशून सावंत यांनी भाषण केले. तसेच होय, आरक्षण आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीलाही आरक्षण पाहिजे, आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

…त्यामुळे अजित पवार यांना तसं बोलावं लागतं

राज्य सरकारने नुकतीच पालकमंत्र्यांची (Guardian Minister) घोषणा केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका मंत्र्याकडे जास्त जिल्हे दिल्यावरुन टीका केली होती. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित दादा विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना तसं म्हणावं लागतं. अजित दादा वस्तूस्थिती जाणणारे आहेत असे मी मानतो त्यामुळे सहा जिल्हे हे काय दोन वर्षांसाठी राहणार नाहीत. हे टाईम अरेंजमेंट असल्याचे पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस योग्य भूमिका घेतात

पुण्यात PFI च्या आंदोलनावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा (Pakistan Zindabad Slogan) देण्यात
आल्या विरोधात कारवाई करण्याच्या बाबतीत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले.
यावर ते म्हणाले, अशा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या विषयाने आपल्याला अपुरी माहिती
असेल तर आपण काही बोलू नये. मी यावर काहीही बोलणार नाही.
गृहमंत्री कायद्याचे तज्ज्ञ आहेत, कायद्याचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे ते योग्य भूमिका घेतात.
तर हा सेंसिबल विषय आहे. गुप्तता राखण्याचा विषय आहे.
पोलीस खात्यावर (Police Department) कोणताही दबाव आणू नये.
तुम्ही काय करता तुम्ही काय करता असं विचारु नये, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Maratha Reservation | chandrakant patil took the side of tanaji sawants controversial statement regarding maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा

Loss Belly Fat | ‘या’ आहेत त्या 5 गोष्टी ज्या फॉलो केल्याने कमी होईल वजन, गायब होईल पोटाची चरबी