Maratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती संभाजीराजेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील आढावा बैठक घेण्यापूर्वी पवार यांचा थेट ताफा कोल्हापूर  न्यू पॅलेस (Kolhapur New Palace) येथे गेला. अजित पवार (Ajit pawar) यांनी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांची भेट घेतली. भेटींदरम्यात तासभर चर्चा करण्यात आली होती. अजित पवार (Ajit pawar) आणि छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje)  यांनी या भेटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आज पुण्यात खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांची भेट घेतली. मराठा आरक्षण (Maratha reservation) संदर्भात चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अजित पवार (Ajit pawar) आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान संभाजीराजे म्हणाले, अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. मला राजमहालातून कळवण्यात आलं होतं. परंतु, काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे. असे खा. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. यावेळी भेटीसंबंधी माध्यमांनी विचारलं असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भेटीनंतर छत्रपती शाहू महाराज म्हणाले..

चर्चेमध्ये मराठा आरक्षण (Maratha reservation) मुद्यासह इतर गोष्टीमध्ये चर्चा झाल्या. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सरकार निश्चित सकारात्मक आहे. तसेच मराठा समाजासाठी जे शक्य आहे ते करणार असल्याचे अजित पवार (Ajit pawar) यांनी चर्चेत म्हटलं असल्याचं छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी सांगितले. तर अजित पवार (Ajit pawar) याबाबत सविस्तर सांगतील असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जो निकाल दिला आहे त्यावर सर्वानी अभ्यास करणं आवश्यक आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे, असं मराठा आरक्षणावर बोलले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) अन्य मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

कोल्हापुरात आयोजित बैठकी दरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, चहाच्या निमित्ताने मी गेलो होतो त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणावर (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने निर्णय़ दिला आहे.
पंतप्रधान मोदींपुढेही हा मुद्दा मांडला होता. आमची काय मागणी होती ते देखील सांगितलं होतं.
आरक्षणाच्या संदर्भात बिल आणून ते मांडून कायदा करावा अशी विनंती देखील केली होती.

असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : maratha reservation chhatrapati sambhajiraje on ajit pawar and chhatrapati shahu maharaj meet

हे देखील वाचा

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

Pune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे