CM उद्धव ठाकरे घेणार मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कालच (रविवारी) मराठा आरक्षण maratha reservation प्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) उद्या (मंगळवारी) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणावर maratha reservation  या भेटीत चर्चा होणार असल्याचं वर्तवलं जात आहे.

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

मराठा आरक्षणावर maratha reservation चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती.
उद्धव ठाकरे यांची ही विनंती पंतप्रधान कार्यालयाने मान्य केलीय.
यामुळे उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे.
म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील.
मुख्यमंत्र्यांसमवेत काही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सोबत असल्याच सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे.
यावरून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने भेटीकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.

Corona Vaccination | ‘कोविशील्ड’ घेतलेल्यांना मोठा दिलासा तर ‘कोव्हॅक्सिन’ अन् ‘स्पुटनिक’ लस घेतलेल्यांना धक्का, जाणून घ्या

या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. परंतु, केंद्राने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Eknath Khadse on Devendra Fadnavis | … तर फडणवीस लगेच सरकार स्थापन करायला तयार होतील, एकनाथ खडसेंचा सणसणीत टोला

 

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या