×
Homeताज्या बातम्याMaratha Reservation | बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा,...

Maratha Reservation | बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, नाना पटोलेंची मागणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ (Maratha Reservation) सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची (Maratha Society) बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तानाजी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या सावंत यांची मंत्रीमंडळातून (Cabinet) तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केली आहे.

 

 

 

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही लढा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी आपला रोष व्यक्त केला.

तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने (Controversial Statement) करुन वातावरण बिघडवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते.
या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती.
तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे,
सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी
त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

Web Title :- Maratha Reservation | congress leader nana patole slams shivsena tanaji sawant over controversial statement on maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे’ – चंद्रकांत पाटील

CM Eknath Shinde Vs Shivsena | ‘मुले पळवणारी टोळी ऐकलेय, पण बाप…’, शिंदे गटाविरोधात फलकबाजी; नवरात्र मंडळाचे फलक पोलिसांनी हटवले

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा

Loss Belly Fat | ‘या’ आहेत त्या 5 गोष्टी ज्या फॉलो केल्याने कमी होईल वजन, गायब होईल पोटाची चरबी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News