Maratha Reservation-Eknath Shinde-Manoj Jarange | ”मराठा आरक्षण न्यायालयात नक्की टिकणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास, जरांगेंना म्हणाले…

मुंबई : Maratha Reservation-Eknath Shinde-Manoj Jarange | तुम्ही इतके दिवस कशासाठी आंदोलन केले होते? तुम्ही आरक्षणासाठी आंदोलन केले आणि सरकारने ते दिले आहे. सरकार तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट करत आहे. त्यामुळे मला वाटते की आता हे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यावर आंदोलन करायची वेळ येणार नाही, असे काम आपल्या सरकारने केले आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना दिले.(Maratha Reservation-Eknath Shinde-Manoj Jarange)

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही दिलेल्या १० टक्के आरक्षणावर कारण नसताना प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हे आरक्षण टिकणार नाही, असा दावा केला जातोय. मात्र हे आरक्षण नक्की टिकेल. त्याचबरोबर विरोधकांनाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती, तेव्हा त्यांनी आरक्षण दिले नाही आणि आता आमच्यावर आरोप करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या सरकारने मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे किंवा कायद्याच्या चौकटीत
बसणारे आरक्षण दिले आहे. तसेच दुसरीकडे नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याचे काम चालू आहे.
मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा हव्या आहेत त्या-त्या सुविधा देण्याचे काम सरकारने चालू केले आहे.

ते पुढे म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि इतर समाजांवर अन्याय न करता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.
मराठा आरक्षणाबाबत आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट होती, स्पष्ट आहे आणि यापुढेही ती तशीच राहील.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजावर अनेक लोक मोठे राजकीय नेते आणि मंत्रीदेखील झाले.
मराठा समाज मात्र आरक्षणापासून वंचित राहिला. याच समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आरक्षण दिले.
ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. परंतु, सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील आरक्षण रद्द करताना उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जी निरिक्षणे
नोंदवली होती, त्याचा अभ्यास करुन आम्ही नव्या आरक्षणात सुधारणा केल्या आहेत.

मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे हे सांगणारा सर्वेक्षण अहवाल आपल्याकडे आहे.
ज्यामध्ये समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारी सविस्तर माहिती आहे.
त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत