Maratha Reservation | ‘सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, पण आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय’ – खा. संभाजीराजे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच, 23 जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय केली जाणार आहे. ओबीसींप्रमाणेच मराठा (Maratha Reservation) समाजालाही सवलती देण्यासाठी सरकार तयार आहे. तसेच, 2185 विद्यार्थ्यांच्या नियुक्तीच्या प्रश्नावरही सरकारने 21 दिवसांचा कालावधी मागितला आहे. पण आपण 21 दिवसाऐवजी 1 महिन्यांचा कालावधी सरकारला देत आहोत. त्यामुळे जर 1 महिन्यात आपल्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाही, तर आम्हाला पुढील आंदोलनाची भूमिका ठरवावी लागेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी (MP Chhatrapati Sambhaji Raje) नाशिकमधील पत्रकार परिषदेत दिला आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायच आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. या आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, तिथून केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत असाच पर्याय असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच, राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी, असेही संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) म्हटले आहे.

बहुजन समाज एकत्र बांधण्याचा प्रयत्नः खासदार संभाजीराजे
आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे. मी फक्त मराठ्याचे नेतृत्व करत नाही.
मी मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे, शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे.
संपूर्ण बहुजन समाजच कसा एकत्र राहू शकतो, हा माझा दृष्टीकोन असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

नवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच दिले विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त ‘डोस’

 

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : maratha reservation | government has asked 21 days we are giving 1 month mp sambhajiraje chhatrapati maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update