Maratha Reservation : तिन पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; भाजप नेत्याचा मोठा आरोप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपचे सरकार होते त्यावेळी आम्ही सर्व तांत्रिक बाबी तपासून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात ही टीकवले. मात्र नंतर महाविकास आघाडी आपली बाजू मांडण्यात कमी पडल्याने हे आरक्षण नाकारण्यात आले. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला Maratha Reservation विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेले, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन पुढे म्हणाले, आता मराठा आरक्षणावर Maratha Reservation चर्चा होत असून छत्रपती संभाजीराजे भोसले हे आमच्याच पक्षाचे आहेत. ते मराठा आरक्षणासंदर्भात 7 जून रोजी काय भूमिका मांडतात ते पाहावे लागेल. मोदी सरकारला सत्तास्थापनेस सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

सरकारला योग्य पद्धतीने बाजू मांडता आली नाही
राज्यात भाजप सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण दिले. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिले गेले होते. उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले. दुर्दैवाने आमचे सरकार गेले. यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. म्हणून आरक्षण गेले, असे महाजन म्हणाले.

‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

आरक्षण कोणामुळे गेले त्यांना माहित आहे
आरक्षण नाकारण्यात आले, त्याला भाजप सरकार जबाबदार नाही. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले. म्हणून हे आरक्षण नाकारले गेले. छत्रपती संभाजीराजे भोसले यांना देखील आरक्षण कोणामुळे गेले हे माहित आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष राहणार असल्याचे गिरिश महाजन यांनी सांगितले.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत मौन
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपच्या चार नगरसेवकांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र, गिरीश महाजन यांनी यावर भाष्य करणे टाळले. तसेच यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी