Maratha Reservation | पुण्यात अजित पवार आणि उदय सामंतांचे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले आहे. आंदोलक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी साखळी उपोषण आणि राजकीय नेत्यांना गावबंद केली जात आहे. कालपासून पुण्यात देखील मराठा आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. काल नवले ब्रीज (Navale Bridge) येथे आंदोलकांनी टायर जाळून मुंबई-बंगळुरू महामार्ग (Mumbai-Bangalore Highway) रोखला होता, आज त्या ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज मराठा आंदोलकांनी पुण्यात अजित पवार (Ajit Pawar ) आणि उदय सामंत (Uday Samant) यांचे एका कार्यक्रमासाठी लावलेले बॅनर फाडल्याचा प्रकार घडला आहे. (Maratha Reservation)

पुण्यातील डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास संस्थेने आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी उपक्रमाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित केले होते. परंतु, मराठा आंदोलनाची तीव्रता वाढल्याने सुरक्षेचा विचार करून मंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले. (Maratha Reservation)

मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी राज्य सरकार (State Govt) विरोधात जोरदार
घोषणाबाजी केली. तसेच कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर कार्यक्रमाच्या बाहेर लावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार,
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फ्लेक्स फाडले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस हवालदाराकडून छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हवालदाराचा साथीदार अटकेत

All Political Parties Meeting On Maratha Reservation | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव ! राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन