समाजाचे नेतृत्व करणार नसून समन्वयकाची भूमिका पार पाडणार : खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे किंवा उदयनराजे यांनी बैठकीला येऊन त्याचे नेतृत्व करावे.अशी माहिती पुढे येत आहे.मात्र अद्याप पर्यंत मुख्यमंत्र्याकडून अशा कोणत्याही प्रकारचे निमंत्रण आले नसून त्या स्वरूपाचे बैठक लवकरात लवकर बोलवावी. त्या बैठकीला माझ्यासह सर्वच मराठा समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतले जावे. तसेच याचे मी नेतृत्व करणार नसून समाजाच्या मागे खंबीरपणे उभा राहील आणि एका समनव्यकाची भूमिका पार पडणार आहे.अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पुण्यात मांडली. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना. त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता.ते बोलत होते.

यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणाले की,राज्यात आजअखेर 58 मूक मोर्चे निघाले त्या मोर्चाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. या एवढ्या काळानंतर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आंदोलन होत आहे.मात्र समाजातील प्रत्येकाने हिंसक मार्गाने आंदोलन न करिता शांततेच्या मार्गाने करावे.कायदा हातामध्ये घेऊ नये. त्याच बरोबर आत्महत्ये सारखे पाऊल उचलू नये. असे आवाहन त्यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना केले.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03171445-97e1-11e8-b396-65fc949160be’]

ते पुढे म्हणाले की,मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यानी बैठक बोलवावी. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला बोलवावे. मात्र ही बैठक बंद दाराआड न होता.संबंध महाराष्ट्राला समजेल अशी अशी व्हावी. त्यामध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीना देखील बोलवावे.त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावी.अशी मागणी देखील त्यांनी केली.

चाकण येथील हिंसेच्या घटनेत अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.त्यावर ते म्हणाले की,आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेतले जावे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
[amazon_link asins=’B01I57XLNW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13df7fa5-97e1-11e8-b660-edba04886442′]

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून राज्यातील विविध भागात आंदोलन केले जात आहे.या दरम्यान जाळपोळ च्या घटना घडल्या आहे.अशा आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे.तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार आणि खासदाराच्या घरासमोर आंदोलन केले जात आहे.आज पुण्यात खासदार अनिल शिरोळे आणि खासदार संजय काकडे यांच्या ऑफिस बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये.या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यानंतर खासदार छत्रपती संभाजी राजे एका कार्यक्रमासाठी आले असताना.त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेरावा घालत.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि गुन्हे मागे घेण्यात यावे.या मागण्याचे निवेदन देखील त्यांनी यावेळी दिले.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/