सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सरकारकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतला आहे. कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात आला त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B077RV8CCY,B077RV8CCZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’801b3e8c-b678-11e8-b44d-83741792dc5f’]

मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाल्याने आता मराठा समाजाचाही एक राजकीय पक्ष असणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. सर्वच राजकीय पक्षात मराठा नेते असूनही समाजाला आरक्षण मिळत नाही. प्रत्येक पक्ष हा समाजाचा वापर करत आला आहे. यामुळे मराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांचा स्वतंत्र पक्ष असावा याच्या पार्श्वभूमीवर समाजबांधणीसाठी लोकांची मतं जाणून घेणार आहेत. त्यासाठी ते प्रत्येक ठिकाणी दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात आज कोल्हापूरमधून झाली. आज झालेल्या मेळाव्यात या मुद्द्यावर सगळ्यांचं संगनमत झालं आणि त्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B01DU5OJCQ,B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88c7dbaa-b678-11e8-b2e0-bb759189f6cb’]

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा मोर्चा धुमसत आहे. पण अद्याप यातील कोणतीच मागणी मार्गी लागली नाही. सध्याच्या राजकारणात प्रत्येक पक्षात मराठी समाजातील लोक आहेत. पण तरीही मराठा समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक जण स्वत:च्या समाजाचा फायदा बघत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारावी, मराठ्यांना नोकरीत आरक्षण मिळावं यासाठी हा नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात.

गणेशोत्सव काळात पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

 मंत्र्याच्या पीएला १० लाख दिल्याचा दावा