×
Homeताज्या बातम्याMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक...

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा

ठाणे : Maratha Reservation | अजूनही आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजात (Maratha Community) कमालीची नाराजीची भावना आहे. विशेषता तरूण वर्गामध्ये याबाबत जास्त संताप आहे. आता पुन्हा एकदा मराठा संघटनेने आरक्षणासाठी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच मराठा आरक्षण कधीपर्यंत मिळेल याचा निश्चित कालावधी द्यावा, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Morcha) पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी दिला आहे.

बाबासाहेब पाटील म्हणाले, मराठा आरक्षणातील 2014 व 2019 मधील विद्यार्थ्यांना अधिसंख्य पद निर्माण करून 2014 पासूनचा 7 वर्षाचा संघर्ष संपवला. मराठा समाजातील 1064 मुलांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. मात्र, या मुलांना उद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) न्यायालयीन लढाईबाबत माहिती देताना बाबासाहेब पाटील म्हणाले, मराठा आरक्षणबाबत न्यायालयीन लढाई सुरू असून अशा प्रकारे निकाल येईल ते पहावे लागेल. रिपीटीशन बाबत योग्य निर्णय आल्यास, कशा प्रकारे आरक्षण सरकार देणार, कसे निर्णय घेणार या सर्व गोष्टी पहाव्या लागतील. सरकार दरबारी चर्चा करणार आहोत. मराठा समाजाला 50 टक्क्यात आरक्षण देणार की त्यावरील आरक्षण देणार हे सरकारने पहावे. 10 तारखेपर्यंत अल्टिमेटम देत आहोत. कशा प्रकारे देणार हे लवकरात लवकर स्पष्ट करावे, असा इशारा पाटील यांनी दिला.

बाबासाहेब पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांचा प्रश्न सरकारने सोडवला. विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्त देण्यात आल्या.
विद्यार्थी नियुक्ती घेऊन हजर होण्यासाठी त्या त्या विभागांमध्ये पोहोचले.
परंतु काही अधिकारी अजून ही विद्यार्थ्यांना हजर करून घेत नाहीत.
सरकार सांगेल तेव्हा आम्ही हजर करून घेऊ अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देत आहेत.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार आहोत. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा.
तसेच अशा अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Web Title :- Maratha Reservation | maratha kranti thok morcha aggressive again ultimatum given to cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandni Chowk Flyover | चांदणी चौक पुल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावा

CM Eknath Shinde | मिलिंद नार्वेकर सुद्धा शिंदे गटात जाणार? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले – माझं वागणं पोटात एक, आणि ओठात एक नसतं!

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News