Maratha Reservation | हसन मुश्रीफांची गर्जना, म्हणाले- ‘सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, आघाडी सरकारची ‘ती’ चूक मान्य’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला आम्ही स्वतः स्वस्थ बसू देणार नाही, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजू अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी दिली आहे. तसेच सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने नारायण राणे (Narayan Rane) समिती नेमून मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिले. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिल ही आमची चूक होती. त्यामुळेच हायकोर्टाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) नाकारल्याची जाहीर कबुली मुश्रीफ यांनी दिली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

कोल्हापूरातील पहिल्या मराठा मोर्च्यात (Kolhapur Maratha Morcha) हसन मुश्रीफ बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या.
मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी कालच यावर चर्चा केली.
त्यांनी चर्चेसाठी कधीही तयार असल्याचे म्हटले आहे.
असे मुश्रीफ यांनी सांगितले.
तसेच यावेळी मुश्रीफांनी भाजपला (BJP ) राजकारण न करण्याची विनंती केली.
मुश्रीफ म्हणाले, भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करु नका, मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता.
पण कायदा नीट केला असता तर टिकला असता.
त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता.
मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू असे मुश्रीफ म्हणाले.

Web Title : Maratha Reservation | maratha morcha kolhapur minister hasan mushrif said we will fulfill all demands

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’