मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाकडून 58 मूकमोर्चे काढण्याच आले होते. त्यानंतर राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. याविरोधात मुबंई उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं. त्यानंतर या निर्णयाविरोधात एका बिगरशासकीय संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षण देतेवेळी घटनापीठाने घालून दिलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

मराठा आरक्षणाच्या बाजूने न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी लांबणीवर पडली असली तरी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी आरक्षणावर याचा परिणाम होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या मदतीसाठी कायदेतज्ज्ञांची एक टीमही नियुक्त करण्यात आली आहे. नवे सरन्यायाधीश बोबडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्याचे आदेश रजिस्ट्रार यांना दिले. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जानेवारी होईल, अशी माहिती दिली.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like