Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विशेष अधिवेशनात काल मंजुर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगेसोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी आंदोलनची पुढील आक्रमक दिशा स्पष्ट केली. जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला २३ फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत सगसोयऱ्यांसदर्भात कायदा केला नाही तर २४ फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन केले जाईल.(Maratha Reservation)

मराठा समाजाला पुढील आंदोलनाची माहिती देताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, २४ फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात, शहरात सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन करायचं. या कालावधीत सर्वांनी आपआपल्या गावात रास्ता रोको करायचा. ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन करता येणार नाही, त्यांनी सायंकाळी चार ते रात्री ७ वाजेपर्यंत आंदोलन करायचे.

समाज बांधवांना आवाहन करताना मनोज जरांगे पुढे म्हणाले, हे आंदोलन शांततेत करा. जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. २२ आणि २३ ला आंदोलनाचे निवेदन द्या. आपलं गाव सांभाळा. कोणीही तालुक्याला किंवा जिल्ह्याला यायचं नाही. आपल्या गोर गरीब मराठ्याचा पैसा वाचेल.

जरांगे म्हणाले, पूर्ण गाव आंदोलनात उभं राहिल्याने शक्ती वाढेल.
गावात असल्याने घराला कुलूप लावून आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकता आणि मागेही जाऊ शकता.
यांना जेरीस आणण्यासाठी हे आंदोलन आहे, माझा किंवा कोणाचाही हट्ट पूर्ण करण्यासाठी नाही. हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असेल.

सर्वात मोठ्या रास्ता रोको आंदोलनाची माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले, ३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात
एकाच जिल्ह्यात, एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी १२ ते १ दरम्यान मोठा रास्ता रोको करायचा आहे.
आतापर्यंत अनेक मोठ्या सभा, रॅली आणि आंदोलने झाली. पण इतका मोठा रास्ता रोको झाला नसेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना