मराठा समजाचा पुन्हा एल्गार, विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाच्या पावित्र्यात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पदव्युत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमांतील प्रेवशाचा तिढा न सुटल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. मराठा समजातील विद्यार्थी आझाद मैदानावर काही वेळाचत आंदोलनाला बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मराठा समजाला लागू असलेले आरक्षण यंदा पदव्युत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत लागू होणार नसल्याचा निकाल दिला. कारण मेडीकलचे नोटीफिकेशन मराठा आरक्षण लागू होण्याच्या आधी म्हणजे १३ नोव्हेंबरला आले. याविरोधात मराठा समाज आणि राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर मराठा समाजातील तरुणांनी सरकारकडे यावर उपाय काढण्यासाठी धाव घेतली.

आत्महत्येची धमकी

मराठा समाजाच्या वैद्यकिय अभ्यासक्रमातील आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने विद्यार्थी, मराठा समाजातील नेते आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी केंद्राकडे अधिक जागांची मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु यावेळी विद्यार्थ्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन करून आत्महत्येची धमकी दिली होती.

फि माफ करण्याची सवलत

राज्य सरकारने मराठा आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी सरकारतर्फे भरली जाणार असल्याचे जाहीर केले होते. अण्णाभाऊ पाटील महामंडळामार्फत ही फी दिली जाणार असल्याची माहिती सरकारने दिली होती.

सवलतीवर विचार

मागील काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य़ांचा प्रश्न कायम आहे. या शैक्षणिक सवलतींबाबत विचार करण्यासाठी उद्या मराठा मोर्चाची बैठक शिवाजी मंदिरात पार पडणार आहे.