‘कोविड योद्धे बनून बाहेर पडा’ ! CM ठाकरेंच्या सल्ल्यावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सिंधुदुर्ग: पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या (maratha reservation ) मुद्द्यावर आक्रमक झालेले खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhaji Raje Bhosale) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पूर्वीपासूनच समाजाचा योद्धा आहे. समाजासाठी लढत आलो आहे. कोविड योद्धा म्हणून मी बाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी मराठा समाजाच्या 5 मागण्या मान्य कराव्या. येत्या 6 जून रोजी मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यापूर्वी त्यांनी निर्णय घ्यावा. राजकारण बाजूला ठेवून सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यावा, असे संभाजीराजेंनी (MP Sambhaji Raje Bhosale) म्हटले आहे.

खासदार संभाजीराजे हे तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. 31) सिंधुदुर्गात आले होते. मात्र, समुद्र खवळलेला असल्याने त्यांना किल्यावर जाता आले नाही. समुद्र शांत झाल्यानंतर ते पाहणी करतील अशी शक्यता आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणावर 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती.

मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला मी दिला होता. त्यामुळे राज्यात उद्रेक झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्या त्या भूमिकेचे कौतुक केले होते. आता त्यांनी मला कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. पण मी पूर्वीपासूनच समाजाचा योध्दा असल्याचे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख 4 जून आहे. न्यायालयाने ती आणखी वाढवली आहे. त्यामुळे अहवाल द्यायची तारीख सुध्दा पुढे गेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढू असे उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Also Read This : 

 

ममता बॅनर्जींनी मुख्य सचिवांना दिला स्पष्टच आदेश, म्हणाल्या – ‘मोदी सरकार बुलाती है, मगर जाने का नहीं !’

 

Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या

 

अजित पवारांचा मोदींना टोला; म्हणाले – ‘गुजरातला एक हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या’

 

शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार

 

शिवसेना आमदाराला ‘ते’ प्रकरण पडले महागात; न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा अन् दंड

 

 

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या