Maratha Reservation | मराठा समाजाच्या आंदोलनाची तारीख ठरली

खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक झालेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे.
येत्या 16 जूनला कोल्हापूरात मराठा समाजाचे Maratha society पहिले आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.
गेल्यावेळी मराठा समाजाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात मोर्चे काढले त्याची दखल सरकारने घेतली नाही.
यावर आपण काय बांगड्या भरल्या आहेत का ? आपल्याला एकदाच जोर लावायला हवा पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे.

Rain | विजेच्या कडकडाटासह पाऊस ‘धो-धो’ कोसळत असल्यास काय काळजी घ्यावी? घराच्या बाहेर असल्यास काय करावं? जाणून घ्या

कोल्हापूरात Kolhapur गुरुवारी (दि.10) आयोजित पत्रकार परिषेदत संभाजीराजे बोलत होते.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्‍नी केलेल्या आंदोलनाचे ब्रीद ‘आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय असे असेल.
आंदोलनादिवशी आम्ही बोलणार नाही. आता लोकप्रतिनिधींना बोलावे लागणार आहे.
मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी कायम पुढे होऊन जबाबदारी घेतली आहे.
समाजाच्या हितासाठी आमदार, खासदार काय करणार हे त्यांनी सांगयला हवे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

पोलिसांसाठी खुशखबर ! मिळणार हक्काचं घर, पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्याला तत्त्वतः मंजुरी

मराठा समाजासाठी राज्यातील खासदार अन् आमदारांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे.
आमदार खासदारांना तुम्ही समाजासाठी काय केले हे कोणी विचारले का ? आजच्या बैठकीतील दिशा ही फक्त कोल्हापुरसाठी नाही तर राज्याच्या दृष्टीने ही भूमिका घेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

SSC Result | इयत्ता 10 वी चा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार

 

READ ALSO THIS :

Pune MSEB News | … म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

NCP | … म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नाही – शरद पवार