‘मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन’, छत्रपती संभाजीराजेंचा सरकारला इशारा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. सुप्रिम कोर्टाने आरक्षणाला स्थागिती दिल्यानंतर राज्यभरात सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे देखील या आंदोलनात आघाडीवर आहेत. आज सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. मराठा आरक्षणासहविविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून यामध्ये आज खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सहभाग घेतला होता. यावेळी संभाजीराजेंनी सरकारला इशारा देत थेट तलवार काढण्याची भाषा केली.

या आंदोलनावेळी संभाजीराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये यासाठी समन्वय नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका असा दमदेखील सरकारला दिला. वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारादेखील खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला. त्यामुळं आता हे वातावरण किती गरम होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सरकारला इशारा देण्याबरोबरच आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलनं भाजप पुरस्कृत नाहीत असेही यावेळी संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देत हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे.

खासदार संभाजी राजेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत

समाजात दोन गट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आम्हाला आता गृहीत धरू नका

कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री याच्याशी देणं घेणं नाही.

मुख्यमंत्री यांना सांगून आलो आहे समाज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतो आहे.

समाजाला ताकद देण्यासाठी भवानीचा आशीर्वाद घेतला आहे

संयम कधी सोडायचा माहीत आहे, वेळ आली की तलवार पण काढेन

बारा बलुतेदारी टिकली पाहिजे

80 टक्के मराठा समाज गरीब

आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका- सरकारला इशारा