Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation Protest | राज्याचे राजकारण हे सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार रंगले आहे. जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मागील 9 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून यामध्ये आता ओबीसी समाजाने (OBC Community) उडी घेतली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला (Marathwada Maratha Community) कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जालन्यामध्ये उपोषण (Maratha Reservation Protest) सुरु आहे. राज्य सरकारच्या (State Government) शिष्टमंडळाने दोन वेळा उपोषणस्थळी भेट दिली असून सरकारकडून यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र आता ओबीसी समाज देखील आरक्षणाच्या बाबतीत पुढे आला असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Caste Certificate) देण्यात यावे अशी मागणी आहे. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. मात्र यासाठी आता ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. ओबीसी अंतर्गत हे आरक्षण दिले जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र यावर ओबीसी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विरोध दर्शवला आहे.

ओबीसी समाजाने मराठवाड्यातील या मराठा समजाला ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण देऊ नये असा इशारा राज्य सरकारला
दिला आहे. ‘मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, पण ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही’ असे ओबीसी संघटनांचे
म्हणणे आहे. दरम्यान जालना मधील उपोषण (Maratha Reservation Protest) हे दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे.
सरकार जीआर घेऊन येत नाही तोपर्यंत अन्न पाण्याचा कण घेणार नसल्याचा निश्चय उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी
केला आहे. आत्तापर्यंत अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे.
मात्र सरकारसोबत दोन वेळा करण्यात आलेली चर्चा ही निष्फळ ठरली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | ‘…अजूनही वेळ गेलेली नाही’, रोहित पवारांचा अजित पवार गटातील आमदारांना अल्टीमेटम