मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले ‘कोपर्डी’ पुन्हा चर्चेत

मराठा आंदोलनाची ठिगणी पडलेले 'कोपर्डी' गाव पुन्हा चर्चेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी आंदोलन (Movement) पुकारल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (दि.12) ते नगर जिल्ह्यातल कोपर्डी (Copardi) या गावाला भेट देणार आहेत. कोपर्डीतील घटनेपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनाला (Movement) सुरुवात झाली होती. परंतु तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात (High Court) अद्याप प्रलंबित (Pending) आहे. या नव्या आंदोलानमध्ये या प्रकरणाचा देखील समावेश करावा, अशी मागणी कोपर्डी ग्रामस्थांची आहे.

 

पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शनिवारी दुपारी खासदार संभाजीराजे येणार आहेत. यावेळी ते पीडितेच्या कुटुंबाशी, ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती तात्या सुद्रिक यांनी दिली. कोपर्डी येथील घटनेनंतर एकवटलेल्या मराठा समाजाने (Maratha society) राज्यभरात अनेक मोर्चे काढले. परंतु आता पुन्हा एकदा याच गावातून आंदोलन (Movement) सुरु होत आहे. त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2016 मध्ये कोपर्डीतील मुलीवर अत्याचार
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे जुलै 2016 मध्ये एका शाळकरी मुलीवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाचे स्वरूप पुढे बदले. यानंतर मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पढे आला. मध्यंतरीच्या काळात या प्रकरणाची सुनावणी नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. परंतु त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

खा. संभाजीराजेंचा दौरा महत्त्वपूर्ण
मराठा आंदोलन (Maratha movement) पुन्हा सुरु होणार असल्याने.
या आंदोलनात हाही मुद्दा घेण्यासंबंधी गावकरी आणि नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर संभजीराजे यांचा कोपर्डी दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
कोपर्डीतील पीडित कुटुंबाशी संवाद, स्मृतिस्थळाला भेटही दिली जाणार आहे.
यावेळी गावकरी हा मुद्दा मांडणार आहेत.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

Gangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

Wab Title :- maratha reservation sambhaji raje to visit kopardi on saturday