Maratha Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) वर्ग करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा मागच्या सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आली होती.

 

मागील भाजप सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल.
या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)
आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा समन्वयकांना दिला होता.
उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वर्ग केला आहे.
आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी 5 लाख रुपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रुपये या निधीतून दिले जातील.

शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, बीड 11, जालना 3, उस्मानाबाद 2,
नांदेड 2, लातूर 4, पुणे 3 तर अहमदनगर,
सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.
मराठा समाजाच्या मागणीनुसार सदरहू निधी निर्गमित केल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार मानले आहेत.

 

Web Title : Maratha Reservation | Thackeray government giving 10 lakh each to the heirs of those who died in the maratha movement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jiomart Groceries Orders On Whatsapp | आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान, जाणून घ्या

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

Solapur Crime | धक्कादायक! मोहोळ तालुक्यातील नवोदय विद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नातेवाईकांचा रास्ता रोको