मराठा आरक्षण : तहसील इमारतीवर चढून दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न

बीडःपोलीसनामा आॅनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल आैरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी आंदोलना दरम्यान गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेला काही कालावधी उलटत नाही तोच गेवराई तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1dfe1293-8f17-11e8-b4e5-3d9757f7633a’]

पोलिसांनी प्रसांगवधान राखत वेळीच आंदोलनकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी मोठ्या संख्येने समन्वयकांनी तहसील कार्यालयाला घेराव घालून कुलूप ठोकले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.