Maratha reservation | ‘उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप’ – विनायक मेटे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. मराठा आरक्षणावरुन भाजपकडून (BJP) ठाकरे सरकारची (Thackeray government) कोंडी केली जात आहे.
तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.
यावरुन शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते.

Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

बैठकीत नेमकं काय चर्चा झाली ?
विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.
परंतु या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा झाली किंवा मराठा समाजाला काय मिळालं.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप सांगितले नाही.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं, असे मेटे म्हणाले.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द ‘मोक्का’

मोर्चे काढून सरकारला जाब विचारणार
आता पुढील काळात राज्यातील अनेक ठिकाणी बैठका, मोर्चे आयोजित करून सरकारला जाब विचारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात 15 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
त्याचबरोबर मुंबईत (Mumbai) दुचाकी मोर्चा (Two Wheeler Campaign) काढणार आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी यावेळी दिली.

Spa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 2 जणांना अटक 5 महिलांची सुटका

… यामधून सरकारची मानसिकता दिसून येते
मेटे म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयाने रद्द करून, जवळपास महिना होऊन गेला, तरी देखील सरकार न्यायालयात फेरविचार याचिका (petition) दाखल करू शकलेले नाही.
यामधून सरकारची मानसिकता दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही 5 जून रोजी बीड (Beed) येथे भव्य मोर्चा काढला.
या मोर्चात तरुण वर्गाचा राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष पाहण्यास मिळाला. त्यांच्या मनात पाप आहे

Nana Patole on Sambhaji Raje and Prakash Ambedkar Meeting | नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका’

या सर्व घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली.
त्या बैठकीनंतर मराठा आरक्षणा Maratha reservation बद्दल नेमकी काय चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले नाही.
तेथून हात हलवत आले असून, त्यांच्या मनात पाप आहे, असं म्हणत विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुशखबर ! एकविरा देवी मंदीर अन् किल्ले राजगडावर होणार ‘रोप वे’; ‘आयपीआरसीएल’ सोबत करार