Maratha Reservation : ‘मुख्यमंत्री साहेब, तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकारी हिसकावून घेतले असते तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. 5) पार पडली. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या आदित्य अन् तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते तर मग मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते असे म्हणत राणेनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ठाकरे सकारने मराठा आरक्षणचा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही. फक्त नाटक आणि ढोंगीपणा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा असा इशाराही नितेश राणेंनी सरकारला दिला आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे राज्यातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देव आहे. महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, राज्य सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला. तसेच आता आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे.