Maratha Reservation | छत्रपती संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले; म्हणाले – ‘कोण दिशाभुल करतंय?’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – १६ जूनला कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आंदोलन (Movement) करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण रद्द (Maratha Reservation) झाल्यामुळे मराठा समाज (Maratha society) आक्रमक झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) आणि खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांच्यामध्ये आंदोलनाच्या (Movement) भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. ‘मी मूक आंदोलनाची भूमिका घेतली आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) काही म्हणो’ असा टोला संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) लगावला आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत ते बोलत होते.

मूक आंदोलन (Silent movement) करणार हीच भूमिका- छत्रपती संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कोपर्डी (Kopardi) येथे जाणार असून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ‘२०१६ पासून कोपर्डी घटनेच्या दोषींवर निकाल अजूनही अंमलात आलेला नाही. या प्रकरणाला चार वर्षे का लागली? राज्य सरकारने (State Government) काय करावं? या दृष्टीने माझा कोपर्डी दौरा आहे. २०१६ ला घटना घडली, २०१७ निकाल लागला. प्रकरण हायकोर्टात गेलं. दोषींच्या दोन वर्षे संधीचा कालावधीही संपला, पण पुढची कारवाई का झाली नाही? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थितीत केला. ‘कोपर्डी प्रकरणी राज्य सरकारला विनंती, स्पेशल बेंचच्या माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयाकडे (High Court) मागणी करावी’ अशी मागणीही संभाजीराजेंनी केली. ‘कोण दिलशभुल करतंय? हे सर्वांना माहिती आहे. चंद्रकांतदादा पाटील लाख म्हणत असतील. मी मोर्चा म्हटलेलो नाही. मूक आंदोलन करणार हीच भूमिका. आता लोकप्रतिनिधी बोलावं, ही भूमिका आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

… तर इट्स ओके’ – चंद्रकांत पाटील

‘संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे.
संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे.
सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहोत का? आधी मोर्चा काढतो म्हटला.
नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटला.
पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हटला.
नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे.
१६ तारखेचा मोर्चा काढणार नाही असं म्हटलोच नाही असं म्हणणार असाल तर इट्स ओके’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

Wab Title :- maratha reservation who is misleading sambhaji raje hit chandrakant patil

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा