मराठा आरक्षणाला आंबेडकरांना पाठिंबा द्यावाच लागेल : निलेश राणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थिती मिळाले पाहिजे. दोन सामाजात तेढ निर्माण करणारी विधाने प्रकाश आंबेडकर करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आंबेडकरांना पाठिंबा द्यावाच लागेल. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात राहता येणार नाही. अशा शब्दात स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. तर आम्ही आमचा हक्क मागत आहोत. त्यांनी आम्हाला शिकवू नये. असा सल्ला देण्यास ही ते विसरले नाहीत.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc46df0a-88fd-11e8-b66c-e720a25c12e1′]

यावेळी निलेश राणे म्हणाले की, मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासाठी अनेक वेळा पाठ पुरावा केला असून यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले. ते अगदी शांततेच्या मार्गाने सर्व मोर्चे पार पडले आहेत. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने देखील सरकारला याबाबत लवकारात लवकर याचिका सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे आता सरकारने वेळ न लावता लवकर न्यायालयात याचिका सादर करावी.

आतापर्यंत आम्हाला शांततेच्या मार्गाने मोर्चे काढताना पाहिले आहे. पण आम्ही कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहोत. अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.