मराठा आरक्षण : बीडमध्ये पुन्हा एकाने जीवन संपवले  

बीड :पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु असून आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरूच आहे. बीडमध्ये आत्महत्येची तिसरी घटना समोर आली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण द्यावे एवढीच अंतिम इच्छा’ असल्याची चिट्ठी लिहून पिंपळनेर येथील आंदोलक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शिवाजी तुकाराम काटे (वय ४२ वर्ष) असे मयत आंदोलकाचे नाव आहे.  ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, काटे हे मुळचे पिंपळनेर (ता. बीड) येथील रहिवासी होते. काही दिवसापासून ते जवळील बेडूकवाडी येथे राहत होते,  शुक्रवारी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. त्यांच्या शर्टच्या खिशात चिट्ठी आढळून आली असून, त्यामध्ये मराठा समाजासाठी मी माझे जीवन संपवीत आहे,  मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये समाजाला आरक्षण द्यावे असा मजकूर लिहलेला आहे.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/