विधानसभा 2019 : मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचा ‘महाआघाडीला’ पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या मागे उभे राहून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीमध्ये पुरोगामी विचाराच्या महाआघाडीच्या उमेदवरांना विजयी करून भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेपासून दूर ठेवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारकाची पाच वर्षात एक विटही रचण्यात आली नाही. तसेच पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांचा धडा, संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल अवमानकारक लिखाण करण्याचे प्रकार घडत आहेत. गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्यात निंदनीय प्रकार या सरकारने केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व महाआघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, शहर अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, जिल्हा अध्यक्ष दक्षिण अजय सिंह सावंत, विशाल तुळवे, कार्याध्यक्ष कैलास कणसे, सचिव विश्वजीत चौगुले, जिल्हा संघटक प्रदिप कणसे, जिल्हा कार्यध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद गोतारणे उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी