मराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आता आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबाद येथे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

किशोर शिवाजी हार्दे असे या तरुणाचं नाव असून आरक्षणसाठी जीवन संपवत असल्याचं या तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तहसीलदारांनी मृताच्या नातेवाईकांना दहा लाखाची आर्थिक मदत आणि मृताच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले.

मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत द्या: हायकोर्ट

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे ही घटना घडली. किशोर शिवाजी हार्दे याने आज सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध सुरू केला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तापलं. त्यामुळे औरंगाबाद येथे एका बैठकीला गेलेले तहसीलदार राहुल गायकवाड बैठक सोडून गावात आले आणि त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले . मृताच्या कुटुंबीयांना दहा लाखाची मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. त्यामुळे वातावरण निवळलं असून किशोरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8bc42fb9-b5ad-11e8-a0ff-55c013e9d542′]

सनी लिओनी ‘आमदार निवास’ मध्ये