home page top 1

‘हे’ ऑनस्क्रीन बहिण-भाऊ रिअल लाईफमध्ये होणार ‘विवाहबद्ध’, प्री-वेडिंग फोटोशुट व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता आस्ताद काळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक फोटो शेअर केला आहे त्यामुळे सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फोटोत आस्ताद आपली गर्लफ्रेंड स्वप्नाली पाटीलसोबत दिसत आहे. फोटोतील दोघांची रोमँटीक पोज पाहण्यासारखी आहे. दोघांचंही हे प्रीवेडिंग शुट असल्याचं दिसत आहे.

आस्ताद मराठी बिग बॉसमध्ये असतानाच त्याने स्वप्नाली पाटीलसोबत असणाऱ्या नात्याची कबुली दिली होती. दोघेही अनेक वर्षांपासून नात्यात आहेत असे म्हटले जात आहे. बिग बॉसनंतर आस्तादची लव्ह स्टोरी जगासमोर आली. दोघांनी पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं आहे.

आस्तादने शेअर केलेला फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. सध्या हा फटो व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या प्रीवेडिंग शुटचं कौतुक करत आस्ताद आणि स्वप्नालीला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

‘अशी’ आहे आस्ताद-स्वप्नालीची लव्हस्टोरी
काही वर्षांपू्र्वी एका मालिकेच्या पायलट एपिसोड शुटींगदरम्यान आस्ताद आणि स्वप्नालीने बहिण-भावाची भूमिका साकारली होती. दोघांनी जवळपास 3-4 वर्ष पुढचं पाऊल या मालिकेत काम केलं. स्वप्नालीची मालिकेत एन्ट्री झाली तेव्हा त्यांची मैत्री झाली होती. हळूहळू आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. यानंतर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत त्याने स्वप्नालीला प्रपोज केलं. विचार करू सांगते असे म्हणत स्वप्नालीने जवळपास वर्षभराने आपला होकार कळवला होता.

View this post on Instagram

❤❤❤

A post shared by Swapnalee (@patilswapna) on

View this post on Instagram

Happy birthday @aastadkale 🤗🎂

A post shared by Swapnalee (@patilswapna) on

 

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like