अशोक सराफ सोशलवर ‘एन्ट्री’, ‘इस्टाग्राम’ आणि ‘फेसबुक’वर ‘अ‍ॅक्टिव्ह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विनोदी भूमिका सादर करताना आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटविणारे अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. आज त्यांचे असंख्य चाहते आहे. आजकाल अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र अभिनेते अशोक सराफ यामध्ये कुठेच दिसले नाही त्यामुळे त्यांची आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर पदार्पण करण्याची इच्छा आहे. ही चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अशोक सराफ यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पदार्पण केले आहे.

https://www.instagram.com/p/B6zkMgGpdkr/?utm_source=ig_embed

लवकरच अभिनेत्री पद्मिनीसोबत त्यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून बऱ्याच वर्षांनंतर ते एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट असून इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावाने त्यांचं खातं आहे. विशेष म्हणजे त्यांनी 2 जानेवारी 2020 रोजी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत ‘हो. धनंजय माने इथेच राहतात’, असं सांगितलं.

याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले की, ‘मला अनेकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यास सांगितले होते. मात्र मीच त्यापासून लांब राहत होतो. आपण या सगळ्यांपासून लांबच बरे असे मला वाटत होते. मात्र आता मित्रांच्या, चाहत्यांच्या संपर्कात राहता यावं यासाठी या प्लॅटफॉर्माचा वापर करावा असं वाटलं आणि मी सोशल मीडियावर  अ‍ॅक्टीव्ह झालो’.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !