Marathi Actor Ashok Saraf | अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई : Marathi Actor Ashok Saraf | ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ (Marathi Actor Ashok Saraf) यांना राज्यातील मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत एक्सवर अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच अशोक सराफ यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे
तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar | मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचे महत्वाचे वक्तव्य, ”शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन्…”

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर! म्हणाले, ”पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव, ग्रामीण भागावर अन्याय…”

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला, ”भुजबळांचा हा अपमान, ज्येष्ठे नेत्याचे कॅबिनेटमध्ये ऐकले जात नाही, हे…”

तळेगाव दाभाडे : PMPML बसच्या वाहक व चालकाची मुजोरी, सुट्या पैशांवरून महिलेसोबत वाद घालून गैरवर्तन; दोघांना अटक